Ads

---

… तर गंगापूर – वैजापूर मतदारसंघात विजय मिळवू

By Xtralarge News

September 26, 2021 8:19 pm

Ads

… तर गंगापूर – वैजापूर मतदारसंघात विजय मिळवू

गंगापूर दि. २६ सप्टेंबर :
सर्वजण एकत्र आलो तर गंगापूर-वैजापूर मतदारसंघात विजयाच्या दिशेने वाटचाल करु शकतो असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला महत्वाचा आहे. शिवाय येत्या २०२४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ दे असे साकडे जयंत पाटील यांनी इथल्या मारुती रायाला घातले.

वैजापूरमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पाठीशी राहिलात तर नक्कीच यश मिळेल. संघटनेकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षाही येणार आहेत त्यासाठीची तयारी आतापासूनच करायला हवी असे आवाहनही जयंत पाटील यांनी वैजापूरमध्ये केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा तिसरा दिवस असून शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड केल्यानंतर गंगापूर – खुलताबाद, वैजापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, गंगापूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील निळ, सुनील माने पाटील, वैजापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment