डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको

0
FB_IMG_1623068233652

डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको

ठाणे, दि. 25 सप्टेंबर:
डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने महिलांच्या छोट्यामोठ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, जेणे करून भविष्यात त्यातून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होणार नाही असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

महिलांना, तरुणींना पोलिसांकडे येऊन तक्रार करण्याबाबत विश्वास वाटला पाहिजे, तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांचीच उलटतपासणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन वास्तू, इमारती, बंद कारखाने या भागांत गस्त वाढविण्याचे निर्दशही शिंदे यांनी दिले. ठाणे जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये गस्तीसाठी अधिकची दुचाकी आणि चार चाकी वाहने उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी ठाणे नवी मुंबई व मीरा भाईंदर येथील पोलिस आयुक्त, ठाणे व पालघरचे पोलिस अधीक्षक, ठाण्याचे जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *