Ads

-

एमपीएससीच्या रिक्त पदांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करा

By Xtralarge News

September 23, 2021 7:05 pm

Ads

एमपीएससीच्या रिक्त पदांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करा.

मुंबई दि. २३ सप्टेंबर
राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करण्यावर राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही देण्यात आल्याचे सांगताना त्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील अशी माहितीही अजितदादा पवार यांनी माध्यमांसमोर मांडली.

यासोबतच देशातील प्रत्येक राज्यात सैनिक भरती होत असते. मात्र कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रात ही सैनिक भरती मागील काळात झालेली नाही. राज्यात त्यामुळे ही सैनिक भरती संपूर्ण नियमांचे पालन करून घेण्यात यावी. तसेच राज्यात कुठेही सैनिक भरती असल्यास त्याची संधी मुला-मुलींना मिळण्यात यावी अशा सूचना राज्यसरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment