Ads

--

तमाशा थांबवा नाहीतर राज्यभर तांडव होईल !

By Xtralarge News

August 24, 2021 7:12 pm

Ads

तमाशा थांबवा नाहीतर राज्यभर तांडव होईल !

इंदापूर, दि. 24 ऑगस्ट :
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली आहे. संयम सगळयांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्रीपदाबाबत आदर नक्कीच ठेवला पाहिजे, त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली आहे. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघतो आहोत.
शिवसेनेने हा तमाशा बंद करावा, भाजप कार्यालया समोरील तमाशा थांबवा नाहीतर राज्यभर तांडव होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे.

इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, जी माहिती मला मिळाली त्यामधे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनीने अटक केली आहे, या अटकेचा आम्ही संपुर्णत निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला यातला गर्भित इशारा आम्ही देउ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार वागते आहे ते पाहून तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही महाविकास आघाडीचे लोक करत आहेत. मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविषयी देवेंद्र फडवीसनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली. संयम सगळयांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री पदाबाबत नक्कीच आदर ठेवला पाहिजे त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघतो आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा.

या कारवाई नंतर मंत्री अनिल परब यांची क्लिप सुद्धा बाहेर आलीय. राणे साहेबांनी स्वत: सांगितल मी गुन्हा केलेला नाही. कुणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होत असतील तर मग तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहे, हे लक्षात ठेवा. जर त्या सीडी बाहेर आल्या तर महाविकास आघाडीमधील जे पक्ष आता मांडीला मांडी लावून बसलेलेत तेच एकमेकांवर केसेस दाखल करतील, अशी सीडी, अशी वक्तव्ये, अपमान आम्ही दाखवून देऊ, हे सांगत आघाडीतील पक्षांनी केलेल्या वक्तव्यांंचा उहापोह त्यांनी केला.

No comments to show.

Leave a Comment