Ads

-

परमबीरसिंहवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

By Xtralarge News

August 21, 2021 6:42 pm

Ads

अनिल देशमुख नाही परमबीरसिंगच नंबर वन !

परमबीरसिंह वर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

वाझेला दररोज दोन कोटींच्या वसुलीचे टार्गेट

मुंबई, दि. 21 ऑगस्ट:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच ‘ते’ नंबर वन वसुली मास्टर असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने गोरेगाव पोलिसांना पुराव्यासह दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी परमबीरसिंग, निलंबित एपीआय सचिन वाझेसह अन्य चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाझेच्या म्हणण्यानुसार ‘तो’ नंबर वन हा परमबीर सिंगच असल्याचं तक्रारदार अग्रवाल यांनी पुराव्यासह समोर आणले आहे.

लॉकडाऊन असल्याने नुकसान होत आहे अशा परिस्थितीत नुकसान भरून काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असे वाझेने तक्रारदार अग्रवाल यांना सांगितले होते. तक्रारदार अग्रवाल याला एका गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अग्रवाल याचे भागीदारीतील हॉटेल BOHO सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वाझे हा परमबीर सिंग यांची भीती दाखवून व्यावसायिकांकडून सिंग यांच्या साठीच खंडणी वसूल करत होता. एकूण खंडणीच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम परमबीर सिंग स्वतः कडे ठेवतात आणि उर्वरित 25 टक्के रक्कम इतर अधिकारी वाटून घेतात असेही वाझे याने अग्रवाल यांना सांगितले होते. दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी वाझे ने क्रिकेट बुकींना संपर्क करून परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त त्यामुळे बिनधास्त दरवाजे उघडे ठेवून बुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितले असे तक्रारदार अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अनेक तक्रारदार परमबीर सिंग आणि सचिन वाझे विरोधात तक्रारीसाठी पुढे आल्याने हिम्मत करून आता तक्रार दिली असून परमबीर सिंग आणि वाझे यांच्या पासून जीवितास धोका असल्याने पोलीस सुरक्षेची मागणी अग्रवाल यांनी केली आहे. 20 ऑगस्ट 2021 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात (सीआर 971/2021) सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी पण आरोपी आहेत. कलम 384, 385 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआई दीपाली थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment