महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा !

0
20210816_195754

महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा !

मुंबई, दि.17 ऑगस्ट :
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *