Ads

--

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला जाब विचारावा !

By Xtralarge News

August 12, 2021 3:05 pm

Ads

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला जाब विचारावा !

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की अशोभनीय

मुंबई दि. १२ ऑगस्ट :
संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संसदेचे कामकाज दोन दिवसअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते असेही नवाब मलिक म्हणाले.

संसदेतील महिला सदस्यांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला, लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे असेही नवाब मलिक म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment