क्वारंटाईन सेंटरमध्येच ‘प्यार का सिलसिला’, तोही दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर !
नागपूर, दि. १६ जुलै २०२०
जगभरात सगळेजण या कोरोनामुळे पार वैतागून गेलेत. काहींसाठी कोरोना संकट झाले आहे, काही लोकांसाठी लोकांना लुटण्याचा धंदा झाला आहे. तर काहींनी या संधीतही चांदी करुन घेतली…एका महिलेला कोरोना झाल्यामुळे तीला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले, हे तिच्या हिरोला कळताच तोही पठ्ठ्या त्याच क्वारंटाईन सेंटरमध्ये गेला. तीने सुद्धा हा आपलाच पती आहे असे सांगून त्याला तिथेच क्वारंटाईन करुन घेतले आणि काय मंडळी अख्ख्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाची कमी आणि या दोघांचीच चर्चा झडू लागली पण इथं ‘कहानी में ट्विस्ट’….तिकडे ही भानगड त्या हिरोच्या खऱ्या बायकोला समजली आणि झाला की राव सगळा इस्कोट…
तर मंडळी हे प्रेम प्रकरण, लफडं, जे काय म्हणायचं ते आहे नागपूरचं आणि तेही पोलीस दलातलं…तर कहानी अशी आहे…पोलीस दलातील दोन विभागातील चौघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या दोन्ही कार्यालयातील सहकारी तसेच पोलिस दलातील इतर कर्मचाऱ्यांना सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्वारन्टाइन करण्यात आले. मंडळी यात कोरोना झालेली महिला पोलीस ‘सपना’ सुद्धा होती. आता ‘सपना’ क्वारंटाइन झाली असे कळताच तीचा पोलीस दलातील हिरो ‘वासू’ त्याच क्वारंटाईन सेंटरला दाखल झाला. सपनाने सुद्धा वासू हाच आपला पतीदेव आहे असे सांगून दोघेही मस्त मजेत क्वारंटाईन झाले. या वासू सपनाच्या ‘एक दुजे के लिए’ची चर्चा सगळ्या प्रशिक्षण केंद्रात पसरली. या दोघांचे वर्षभरापासूनच ‘झेंगाट’ सुरु होतं. मैत्री, नंतर ‘प्यार का सिलसीला’ आणि मग ‘एक दुजे के लिए’, करत डायरेक्ट क्वारंटाईन सेंटरमध्येपण प्रेम कहानी सुरुच राहिली.
आता तुम्ही म्हणाल यात काय, चालायचंच, पण मंडळी ‘कहानी मे पुन्हा ट्विस्ट’…त्या वासूच्या खऱ्या बायकोला हे सगळं कळलं आणि तिने क्वारंटाईन सेंटरवर धडक मोर्चा वळवला आणि ती माऊली पाहते तर काय, हे वासू-सपना दोघेही, एक कमरे में बंद !….माऊलीचा पारा चढला ना राव.. पण काहीही उपयोग झाला नाही. मुलासह आपल्याला सोडून आपला नवरा या बयेच्या नादाला लागलेला पाहून ती माऊली पार कोलमडून गेली राव. शेवटी नाईलाजाने नवऱ्याविरोधात पोलीस स्टेशन गाठले. पण काहीच उपयोग झाला नाही.
सगळ्या नागपुरात सध्या याच लफड्याची सध्या चर्चा सुरु आहे…
(वासू सपना ही खऱी नावं नसून काल्पनिक आहेत.)
