Ads

-

साक्षीचा खर्च मंत्री एकनाथ शिंदे उचलणार!

By Xtralarge News

August 4, 2021 11:42 am

Ads

साक्षीचा खर्च मंत्री एकनाथ शिंदे उचलणार!

साक्षीच्या अतुलनीय धाडसाचे एकनाथ शिंदे यांचेकडून कौतुक.

मुंबई, दि. 4 ऑगस्ट:

पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती. तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले असून ‘केईएम’मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता.

ही मुलगी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते. पण आता तीला पाय गमवावा लागलाय. कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जातं होत. याची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी साक्षीला मदत करण्याचा निर्णय घेतला.

पोलादपूर दुर्घटनेतील साक्षी दाभेकर आणि प्रतिक्षा दाभेकर या दोन्ही जुळ्या बहिणींच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी उचलली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून साक्षीच्या रुग्णालयातील उपचारासाठी सर्वोतोपरी आर्थिक मदतही शिंदे करणार आहेत.

 

No comments to show.

Leave a Comment