साक्षीचा गमावलेला पाय बसविण्याची वैद्यकीय व्यवस्था करणार

0
IMG-20210804-WA0032

साक्षीचा गमावलेला पाय बसविण्याची वैद्यकीय व्यवस्था करणार

साक्षी दाभेकरची प्रविण दरेकर यांनी घेतली केइएम रुग्णालयात भेट

मुंबई दि. 4 ऑगस्ट :
धैर्यवान साक्षी दाभेकरची विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी के. ई. एम. रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तिच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साक्षीचा गमावलेला पाय बसविण्याची वैद्यकीय व्यवस्था भाजपतर्फे करण्यात येईल असे दरेकर यांनी सांगितले.
पुढील वैद्यकीय उपचारासाठी १ लाखाचा धनादेश तिच्या कुटुंबियांना देण्यात आला.

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात १४ वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धिटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे ती जबर जखमी झाली. केईएम रुग्णालयामध्ये तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दुर्दैवाने तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. साक्षी दाभेकरच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून प्रविण दरेकर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश तिच्या वडिलांकडे सुपूर्द करत यापुढेही मदत करण्याचे आश्वासन देत तिच्या घरच्यांना धीर दिला.यावेळी के. ई. एम. रुग्णालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रवीण बांगर आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *