आपतीग्रस्तांना मनसे आमदार राजू पाटील यांची मदत

0
IMG-20210803-WA0040

आपतीग्रस्तांना मनसे आमदार राजू पाटील यांची मदत.

डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट :
मनसे आमदार राजू पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तळीये गावासाठी  त्यांनी 11 लाखाचा धनादेश दिला.

मूसळधार पावसामुळे महाड, खेड, चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात पूर आला होता. यात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले.पूरग्रस्तांच्या सेवेला सामाजिक संस्था आणि मनसे कार्यकर्ते धावून गेले आहेत.पूरग्रस्तांना डोंबिवली मनसे तर्फे सुद्धा अन्नधान्य, कपडे तसेच गृहउपयोगी वस्तू दिल्या. मंगळवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी महाड, तळीये, खेड येथे पाहणी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आमदार पाटील, सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी जेवढी मदत करता येईल तेव्हडी मदत मनसे पक्षाकडून केली जाईल असे सांगितले.


दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गावात जाऊन सुद्धा मनसे आमदार पाटील यांनी पाहणी केली. तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळून दुर्दैवी घटना घडली.सदर घटनेची सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.आता याच गावाला आमदार राजू दादा पाटील यांच्याकडून 11 लाखाचा धनादेश दिला आहे.मनसे आमदार यांनी खेड गावातील बाजारपेठची सुद्धा पाहणी केली.यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सरचिटणीस मनोज चव्हाण, जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, संदीप म्हात्रे , योगेश पाटील आणि महाड/खेड/डोंबिवलीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *