Ads

--

एमपीएससी सदस्यांच्या नियुक्त्यांचा विषय राज्यपालांकडे

By Xtralarge News

August 2, 2021 10:51 pm

Ads

एमपीएससी सदस्यांच्या नियुक्त्यांचा विषय राज्यपालांकडे

मुंबई, दि. २ ऑगस्ट :
एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यसरकारने अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला असून राज्यपाल त्यावर लवकरात लवकर हस्ताक्षर करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

३१ जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नांवे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करुन प्रस्ताव परत शासनाकडे पाठवतील व त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल मात्र निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

No comments to show.

Leave a Comment