छत्रपतींचे नाव बदलून अदानींचे नाव देणे सर्वात मोठी चूक
छत्रपतींचे नाव बदलून अदानींचे नाव देणे सर्वात मोठी चूक
मुंबई दि. २ ऑगस्ट :
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नांव बदलून अदानी विमानतळ करणे योग्य नाही ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी व शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नांव बदलून अदानी एअरपोर्ट करावे. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. परंतु नांव बदलण्याचा व नांव ठेवण्याचा अधिकार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.
