अशी असेल पुणे मेट्रो !
अशी असेल पुणे मेट्रो !
पुणे, दि. 30 जुलै:
पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणून पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल. आता हाच अनुभव पुणेकराना अनुभवण्यास मिळणार आहे. पुणे मेट्रो ची खास वैशिष्ट्य अशी आहेत
१. देशातील सर्वात हलके मेट्रो कोच:
कमी वजनाच्याअॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.
डिझाइन गती ९५ किमी प्रतितास.
प्रवासी क्षमता ९७५ पॅक्स / ३ कार ट्रेन (६ कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)
२. सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण:
११.१९ मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.
त्यामुळं प्रति वर्षी २० कोटींची बचत.
दरवर्षी अंदाजे २५ हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.
३. नावीन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना: एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)
दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.
या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.
शहरातील सुमारे २०० रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.
४.‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :
कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.
३ लाख ८० हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.
५ . कार्यक्षम पाणी व्यवस्थापन :
सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.
बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.
प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.
६ . वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :
शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडेकाढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांच ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत १ हजार ६९८ झाडांचं पुनर्रोपण तर ११ हजार ६८३ नवीन झाडांची लागवड करण्यात आली.
७ . ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण :
स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – २.१० दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – १.०२ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
रेंज हिल डेपो -२.०९ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –१.८७ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
