आपत्ती व्यवस्थापनातील कुशल नेतृत्व – एकनाथ शिंदे

0
FB_IMG_1627578288130

आपत्ती व्यवस्थापनातील कुशल नेतृत्व – एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 29 जुलै:

गेला आठवडाभर आधी महाडमधील तळीये हे दुर्घटनाग्रस्त गाव, त्यानंतर पोलादपूर, त्यानंतर साताऱ्यातील कोयनानगर येथील आंबेघर, मीरगाव, हुम्बनाळे ही त्या पट्ट्यातील दरडग्रस्त गावे, मग खर्डी, चिपळूण, खेड करत करत मुंबई असा पूरग्रस्त भागाचा दौरा मी राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत केला. आपत्ती व्यवस्थापनातील त्यांचं कौशल्य मी सांगण्याची अजिबात गरज नाही 2019 सालचा सांगली-कोल्हापूर मधील पूर असो किंवा बदलापूर जवळ अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस असो ज्या तत्परतेने त्यांनी जाऊन मदत पोहचवली ते संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. कोकणात यावर्षी आलेल्या या प्रलयंकारी पुरात तातडीने जीवनावश्यक वस्तू, चादरी, ब्लँकेट्स, कपडे, सतरंज्या, छत्र्या, असे साहित्य त्यांनी पूरग्रस्त भागात रवाना केले. अवघ्या 3 दिवसात अशी 25 हजार पॅकेट्स तयार करून दररोज 6 हजार किट्स पूरग्रस्त भागाकडे रवाना केली. याशिवाय आमचे मित्र मंगेश चिवटे यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कशाची पथके असो, ठाणे महानगरपालिकेचे टीडीआरएफचं पथक असो हेही त्यांनी तळीये आणि महाड,चिपळूण मध्ये मदतीसाठी रवाना केले. याशिवाय ठाणे, नवी मुंबई महानगरपालिकेची मदत पथके देखील कोकणात रवाना केली. या मदतिचे अतिशय सूक्ष्म नियोजन करून आपली ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची टीम कामी लावून आधी मदत पोहचवली आणि मगच या भागाचा दौरा केला. या टीममधील महत्वाचा दुवा असलेले साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे साहेब, सचिन जोशी साहेब त्यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर साहेब, विशेष कार्य अधिकारी डॉ. राजेश कवळे साहेब, कृष्णा जाधव साहेब, डॉ. राहुल गेटे साहेब, डॉ. वैभव पवार साहेब अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची फळी निरनिराळ्या गोष्टी उभ्या करण्यासाठी रात्रंदिवस झटत होती. याशिवाय निस्वार्थ भावनेने मदतीसाठी धावून गेलेले ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, शशिकांत जाधव,नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक विकास रेपाळेअसे अनेक शिलेदार यात स्वतःहून पुढे आले. या चेहऱ्याची मेहनत कधीच पुढे येत नसल्याने त्यांची नावं यावेळी मी आवर्जून लिहिलेली आहेत.

साहेबानी केलेल्या मदतीचा बातम्या तर आपण सगळ्यांनीच वाचल्या मी सांगतो आहे तो किस्सा थोडा वेगळा आहे. गेल्या काही दिवसात आपण महाड चिपळूण मधील पुरामधील दयनीय परिस्थिती पहिली. सावित्री, जगबुडी या कोकणातील नद्याचे पाणी शहरात घुसल्याने या शहरांचे अतोनात नुकसान झाले. या शहरांची पाहणी करून श्री. शिंदे हे चिपळूणच्या बाजारपेठेत आले. तोपर्यंत सगळे प्रशासकीय अधिकारी मदतीमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्यासोबत फक्त स्थनिक आमदार भास्कर जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते होते. याच दिवशी राज्यपलांचा दौरा देखील चिपळूण शहरात होता त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर तोही ताण होता अखेर पाहणी संपवून परतत असताना चिपळूणचे मुख्याधिकारी तिथे हजर झाले. साहेबानी त्यांना हे सगळे नक्की कधीपर्यंत साफ होणार असे विचारले. मात्र हे अधिकारी करतो साहेब यापुढे काहीच बोलू धजत नव्हते. कारण आधी एका प्रमुख केंद्रीय नेत्याने ज्या शब्दात त्यांच्याशी बोलले होते तो अनुभव पाहता आता हे तर नगरविकास मंत्री म्हणजे हे सुध्दा आपल्याला झापणार अशीच त्यांची समजूत झाली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना अखेर त्यांची देहबोली पाहून 2-3 मिनिटात साहेबांनी ती गोष्ट हेरली आणि म्हणाले तुम्ही घाबरू नका अजिबात एकदम शांत रहा, नक्की काय प्रॉब्लेम आहे मला नीट सांगा इथे तुम्हाला कुणीही काही बोलणार नाही याची हमी मी तुम्हाला देतो ह सांगा, असं म्हणताच हे अधिकारी थोडे सावरले त्यांनी तात्काळ समस्यांचा पाढा वाचला साहेब मनुष्यबळ कमी आहे, आमच्या कर्मचाऱ्यांचा घरात देखील नुकसान झालं आहे. संपूर्ण शहर स्वच्छ करायचं आहे पण मशिनरी कमी आहे. त्यावर साहेबानी तत्काळ 5 मुख्याधिकारी दर्जाचे अधिकारी तुमच्यासोबत मदतीला देतो असं सांगितलं. याशिवाय ठाणे, नवी मुंबई येथून निघालेले कर्मचारी आमच्या स्वछता मशिनरी सकट तुमच्या मदतीला येतील त्याची देखील व्यवस्था करतो अस सांगितलं. याशिवाय तुमच्याकडे शहर स्वच्छ करायला फंडस आहेत का..? अधिकारी म्हणाले कमी आहेत.पुरेसे नाहीत त्यावर त्यांना जवळ घेऊन तुम्हाला मी नगरविकास मधून 2 कोटींचा फंड देतो फक्त ते पैसे तुम्ही फक्त शहर स्वच्छ करण्यासाठी वापरा. पुढच्या 2 दिवसात तुम्हाला पैसे मिळतील. अशात शहरात रोगराई वाढायच्या आत तुम्ही शहर स्वच्छ करा असं साहेबानी त्याला सांगितलं. हे ऐकताच हे अधिकारी एकदम रिलॅक्स झाले म्हणाले हो साहेब आम्ही वेगाने काम पूर्ण करू कुणालाही तक्रारीसाठी जागा देणार नाही. हे बोलून तो अधिकारी साहेबाना थेट त्यांच्या गाडीपर्यत सोडायला आला. इथे सांगायचं ते एवढंच की शेवटी अधिकारी देखील आपल्यासारखी माणसेच आहेत. आपल्याला ज्या अडचणी आहेत त्यांच त्यांना देखील आहेत.

 

चिपळूणपासून खेडला जोडणारा परशुराम घाटात रस्त्याखालचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे घाटातून फक्त छोट्या वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. आपण मुंबई ठाण्यातून कितीही मदत जमवली तरीही ती खेडच्या पुढे पोहचणे अशक्य आहे. हे मदतीचे ट्रक सातारामार्गे कुंभार्ली घाटातून आले तरच चिपळूण पर्यंत पोहचू शकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शहर वेगाने स्वच्छ करण्यासाठी लागणारे जेसीबी डंपर, वाहने बाजूला काढण्यासाठी लागणारी हायड्रो क्रेन तिथे पोहोचण्यात अनेक अडचणी आहेत. तरिही तेथील स्थानिक यंत्रणा उपलब्ध मनुष्यबळ हाताशी धरून दिवसरात्र मदतकार्य आणि स्वच्छतेचे काम करत आहे. घाटात त्या रस्त्याच काम करणारे इंजिनिअर साहेबाना म्हणाले साहेब मला या रस्त्याचं महत्व माहीत आहे. हा रस्ता दुरुस्त केल्याशिवाय मदत पोहचवता येणे अवघड आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण करून मी दोन्ही लेन सूरु करणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही 24 तास काम करेन. मला याक्षणी कुणावर आरोप ठेवायचे नाहीत मात्र नुसत्या समोरचा अधिकारी ऐकून घेतो म्हणून त्याच्याशी वाटेल तसं बोलणारे आणि समोरच्या अधिकाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्याचं निराकरण करणारे आशा दोघात निवड करायची झाल्यास दुसऱ्याच म्हणणं ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढणार नेतृत्व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गरजेचं असतं. एकनाथ शिंदेंच्या रुपात तेच मिळाल्यामुळे त्यांनी प्रशासनाचे प्रश्न अडचणी समजून घेऊन त्याना मार्गदर्शन केलेच पण सोबतच महाडसाठी 50 लाख, चिपळूण साठी 2 कोटी आणि खेड शहराला 1 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करून ती लवकरात लवकर कशी मिळेल याची पूर्ण तजवीज करूनच ते मुंबईत परतले. त्यामुळेच या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनात त्यांचे कौशल्य आणि तत्परता पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाली.

विराज मुळ्ये
(मा. मंत्री महोदय यांचे माध्यम समन्वयक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *