पूरग्रस्तांना १० हजारांची मदत थेट खात्यात !
पूरग्रस्तांना १० हजारांची मदत थेट खात्यात !
मुंबई, दि. २९ जुलै
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तात्काळ १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने शुक्रवारपासून १० हजारे पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी माहिती मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केली आहे. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचे वाटप केले तर अनेक आरोप होतात. पैशाचे वाटप बरोबर झाले नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही. त्यामुळे हे पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत.
