Ads

-

महानिर्मितीच्या मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवा

By Xtralarge News

July 22, 2021 7:45 pm

Ads

महानिर्मितीच्या मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवा.

एसेट मॉनिटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करा.

मुंबई, दि. 22 जुलै :

महानिर्मितीने आपल्या खर्चात काटकसर करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. वीज निर्मिती केंद्रात वापरात नसलेल्या जागेचा वापर लोखंड व स्टील निर्माण करणाऱ्या कारखान्यांसाठी करून रोजगार निर्मिती करणे व असेट मॉनीटायझेशनसाठी इतर उत्तम पर्यायांचा विचार करण्याची सूचना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली.

ऊर्जा मंत्री म्हणाले की, “वीज निर्मिती केंद्र व त्यांच्या वसाहती येथे मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा आहेत. या जागांचा व्यावसायिक पद्धतीने वापर करून महानिर्मितीचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यासाठी महानिर्मितीचे व्यावसायिक पातळीवर व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.एसेट मॉनिटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करा,” असे निर्देश डॉ. राऊत यांनी आजच्या बैठकीत दिले.

वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी निर्मिती केंद्राची कार्यक्षमता वाढविणे, रिक्त जागेवर नोकर भरती करणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी विषयांवर त्यांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महानिर्मितीचे संचालक संचालन चंद्रकांत थोटवे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment