• Thu. Mar 13th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड.

ByXtralarge News

Dec 10, 2024
Visits: 43 Today: 2 Total: 4116283

नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड.

मुंबई, दि. १० डिसेंबर :

विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची कामकाजाची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबदल उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. अध्यक्षपदाला या कायदेमंडळात अधिक महत्व आहे. ॲड.नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचा, राज्याचा कारभार चालतो. सर्वसामान्य व्यक्ती संविधानामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होवू शकतो. राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास होईल. त्यामुळे या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सभागृहात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *