होय, मी अहंकारी पण महाराष्ट्राच्या हितासाठी!
होय, मी अहंकारी आहे पण महाराष्ट्राच्या हितासाठी !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला सणसणीत उत्तर.
मेट्रो कारशेड साठी विरोधकांनी एकत्र यावे.
मुंबई, दि. 20 डिसेंबर:
मी अहंकारी आहे माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. आरे कारशेड आपण मुंबई मेट्रो ३ ची करणार होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेत घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्या जंगल मारत मारत ही जागा वाढवावी लागली असती. म्हणूनच कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या भाजपाला उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे.
‘कांजूरमार्गला ४० हेक्टर जागा सरकारला मिळाली होती. ती जागा ओसाड आहे, कांजूरमार्गला मेट्रोच्या ३, ४ आणि ६ मार्गिकेच्या कारशेड करण्यात येणार होत्या. जिथे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे इतर लाइनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ मेट्रोच्या एका लाइनसाठी आरेमध्ये कारशेड का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.
