खासदार तर मीच होणार !
मुंबई, दि. 20 मे :
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज सहकुटुंब घराजवळील आयडीबीयुएस या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून आल्यानंतर त्यांनी मिहीर कोटेचा यांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला.
ईशान्य मुंबईत एकूण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात असून ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील तर भाजपचे उमेदवार कोटेचा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. ईशान्य मुंबईत 1600 बूथ असून किमान 16 लाख मतदार आहेत. ईशान्य मुंबईत मुलुंड भांडुप कांजूरमार्ग विक्रोळी शिवाजीनगर गोवंडी तसेच मानखुर्दचा काही परिसर येतो. 30 एप्रिल रोजी संजय दिना पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली. दीड महिना संजय दिना पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, रॅली, सभा, मतदारांना भेटून प्रचार केला.
गेले दीड महिना प्रचाराच्या काळात आरोप प्रत्यारोप करण्यात आले. भाजपचे उमेदवार कोठेचा यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. एकंदरीत ईशान्य मुंबईचा कौल पाहता संजय पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळेच भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याने त्यांनी वैयक्तिक टीका करण्यावर जोर दिला. खोटे आरोप केले. कधी दगड दगडफेक केल्याचा आरोप तर कधी ड्रग्स माफिया म्हणून टीका केली. मात्र कोटीचा यांनी गेल्या पाच वर्षात ईशान्य मुंबईत काय काम केले याबाबत वाच्यता केली नाही. बेरोजगारी, महागाई याबाबत विचारले असता, त्यांनी मटन, मछली, मंगलसूत्रावर चर्चा केली. कधी गुंड तर कधी माफिया म्हणून उच्चार केला. मात्र ते कधी विकास कामावर बोलले नाही. कोटेचा आमदार असूनही खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली. गेल्या पाच वर्षात मुलुंड विधानसभा परिसरात त्यांनी विकास काम केली नसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. अनेक ठिकाणी ते प्रचार करण्यासाठी गेले असता लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. माजी खासदार मनोज कोटक हे शिवसेनेच्या मतांवर 2019 साली निवडून आले होते. मात्र यंदा शिवसेना वेगळी झाल्याने कोटेच्या यांच्या विजयावर त्याचा परिणाम होणार आहे. कोठेच्या यांना गुजरात समाजाचे मतं मिळतील तर संजय दिना पाटील यांना मराठी, गुजराती, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन असे एकंदरीत सर्वच समाजाची मत मिळतील. संजय दिना पाटील यांचे वडील दिना बामा पाटील तसेच आई मनोरमा पाटील यांचे या भागात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य आहे. त्यांचा वारसा संजय पाटील हे पुढे नेत असून त्यांची मुलगी राजोल संजय पाटील ही पुढची पिढी हा वारसा पुढे चालवत आहे.
