अजय मिश्रा टेनीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा

अजय मिश्रा टेनीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा.. मुंबई दि. १५ डिसेंबर : पत्रकारांना धमकी देणार्‍या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. लखीमपूर घटना ही सुनियोजित कट होता असे एसआयटीने म्हटले असून या … Read more

ओमायक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले

ओमायक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले.. मुंबई, दि. 15 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून देशातील सर्वाधिक ओमयक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव … Read more

शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न

शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न: मुंबई, दि. १५ डिसेंबर : भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे … Read more

कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटींचा आराखडा बनवा !

कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटींचा आराखडा बनवा ! मुंबई, दि. 15 डिसेंबर : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या विकास व सुशोभीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा बृहत् विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सामाजिक न्यायमंत्री … Read more

मुंबई महानगरपालिकेत करोडो रुपयांचा कोविड घोटाळा!

मुंबई महानगरपालिकेत करोडो रुपयांचा कोविड घोटाळा! बीएमसी अधिका-याच्या वडिलांना 100 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट. मुंबई, दि. १४ डिसेंबर : कोविडच्या नावाने मेडिकल इमर्जन्सीच्या अधिकाराचा राक्षसी भ्रष्ट वापर याचे जगातले सगळ्यात मोठं उदाहरण मुंबई महानगरपालिका आहे असे भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेचे वॉर्ड अधिकारी सहाय्यक आयुक्त मनिष राधाकृष्ण वळंजू यांनी १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट … Read more

सीमाभागातील मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ?

सीमाभागातील मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ? मुंबई, दि. १४ डिसेंबर : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही … Read more

हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या !

हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या ! पुणे, दि. १४ डिसेंबर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास … Read more

परमवीरसिंगांना वाचवण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न

परमवीरसिंगांना वाचवण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न. मुंबई दि. १४ डिसेंबर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील केंद्र सरकार व भाजपसोबत झाले होते. त्यातूनच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहेत मात्र एक दिवस एनआयएला खरे काय आहे हे सांगावे … Read more

… ही तर महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची नांदी !

… ही तर महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची नांदी ! नागपूर, दि. १४ डिसेंबर: विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा पराभव करुन आघाडीला मोठा दणका दिला आहे. विशेष म्हणजे ज्या विदर्भातून काँग्रेसला मोठा विजय मिळला होता त्याच विदर्भातून दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून येणे ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची … Read more

MLC निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार!

MLC निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार! मुंबई दि. १४ डिसेंबर: अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले की, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा … Read more