कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये.

0
20210602_114949

कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये.

दोन्ही सरकारने परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता.

मुंबई, दि. २ जून :
कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले. घरातील कमावत्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.त्यांचे शिक्षण,आरोग्य इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्र सरकार व राज्य सरकारने परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारीदेखील आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *