अहमदभाईंना सर्वपक्षीय मान्यवरांची श्रद्धांजली!
अहमद पटेल यांना सर्वपक्षीय मान्यवरांची श्रद्धांजली!
मुंबई, दि. 14 डिसेंबर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ( YB सेंटर ) दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आयोजित शोकसभेत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पक्षाच्या सर्वच मान्यवर नेते मंडळींनी श्रद्धांजली अर्पण केली व शोकसंदेश देतेवेळी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला.
काँग्रेस पक्षाचे अत्यंत अनुभवी व काँग्रेस पक्षाच्या अत्यंत पडत्या काळात देखिल पक्ष संघटन एकसंघ ठेवण्यासाठी झटणारे,सत्ता व संघटनेतला महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जाणारे, काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व अत्यंत विश्वासू सहकारी अहमद पटेल यांच्या अष्टपैलू व्यक्तीमहत्वाचे पैलू यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शोकसभेत उलगडले.
वर्षभरा पुर्वी राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेत निर्णायक क्षणी आदरणीय अहमद पटेलजी यांनी महत्त्वाची भुमिका बजावल्याची कबुली शिवसेना व राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दिली.
आयोजित शोकसभेत अहमद पटेलजी यांचे चिरंजीव फैजल व कन्या मुमताज यांनी देखिल संवेदना व्यक्त केल्या.
अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रफुल्ल पटेल,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ शिंदे, उर्जा मंत्री नितीन राऊत, महीला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,मंत्री छगन भुजबळ,मंत्री नवाब मलिक,राज्य मंत्री सतेज ( बंटी ) पाटील,काँग्रेस नेते राजारामजी देशमुख यांच्यासह काँग्रेसचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गीतकार जावेद अख्तर,अभिनेते-दिग्दर्शक संजय खान,जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी यावेळी अहमद पटेलजी यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.
