भाजपावाले करतात ते ‘लव्ह’ आणि इतरांचे ‘लव्ह जिहाद’?

0
congress

‘लव्ह जिहाद’ कायद्यावरून काँग्रेसचा भाजपाला टोला.
मुंबई, दि. २१ नोव्हेंबर

भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांनी केले तर लव्ह आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लव्ह जिहादच्या नावाने गळे काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहाद विरोधात कायदा आणत आहेत. तसाच कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी भाजपाने केली आहे. त्याचा समाचार सचिन सावंत यांनी घेतला.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी केली आहे. सचिन सावंत म्हणाले की, मुख्तार अब्बास नक्वी यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केले तर ते लव्ह आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *