• Wed. Feb 5th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 64 Today: 1 Total: 4031767

सावरकरांची प्रतिमा काढून टाकणे निंदनीय..

मुंबई, दि. १० डिसेंबर :

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरू असे म्हटले आहे की, सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे या घटनेचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? असा सवाल करत काँग्रेस सोबत आघाडी करताना उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही असेही बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *