• Sun. Sep 15th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 139 Today: 2 Total: 3798182

सोलापूर दि. १२ ऑगस्ट :

शेतकऱ्यांच्या आत्महत्या उत्पन्नाच्या दुप्पटीने आत्महत्या वाढल्या आहेत त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य दाम मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव टोकाचे पाऊल उचलत आहेत. सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत नाही, म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. तसेच आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, हा पर्याय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत ‘शरद शेतकरी संवाद मेळावा’ पार पडला आहे. शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य दाम मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव टोकाचे पाऊल उचलत आहेत. सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत नाही, म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. तसेच आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, हा पर्याय असल्याचे पवार यांनी म्हटले आहे

मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये देखील जनता आमच्या सोबत आहे. बार्शीत आणि पंढरपूर या दोन गावात सायंकाळी सभा होतात आणि त्या चांगल्या होतात. भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात, याचा अर्थ आहे. आपण परिवर्तनाच्या दिशेने उभे आहात हे याचे संकेत आहेत. नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आम्ही जात, पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळला. कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असं सांगितलं होतं. ५० टक्केमध्ये आणून आम्ही आरक्षण देणार आहे, आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत. असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभेला ४०० पार म्हणणाऱ्यांना ३०० ही पार करता आले नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही, या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. यांची धोरणे बदलायची असेल तर सरकार बदला. अन्याय आणि जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *