अजित पवार गट ‘साहेबांना’ का भेटला ?

0
dada

अजित पवार गट ‘साहेबांना’ का भेटला ?

मुंबई, दि. १७ जुलै :

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यनंतर अजित पवारांसह नवीन मंत्र्यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली होती तर सोमवारी अजित पवार गटाच्या आमदारांनी पफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून शरद पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीच्या फुटीवर शंका उपस्थित केली जात आहे.

या भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा अशी विनंती कालही आणि आजही केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, सुनील तटकरे आणि मी रविवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. रविवारी सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित झाले. शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि प्रत्येक आमदारांनी पवार यांचे आशिर्वाद घेतले.

रविवारी पवारांनी जसं आमचं ऐकून घेतलं तसं आजही ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे मी कसे सांगू शकतो. मात्र आमचं म्हणणं ऐकून घेतलं हेही आवर्जून प्रफुल पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *