राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही
राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही
मुंबई, दि. 28 फेब्रुवारी:
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी उद्यापीठास 150 कोटी रुपयास मान्यता दिली आहे. त्यातील 18 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर केले आहेत. पुढील आठवड्यात आणखी 12 कोटी रुपये दिले जाणार आहेत. विधी विद्यापीठाच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे शनिवारी केले होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, मा मुख्यमंत्री साहेबांशी बोलून तिन्ही विद्यापीठांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाला लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. न्यायाधीश भूषण गवई यांनी शासन तिन्ही विद्यापीठाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याबाबत व सर्वातोपरी सहकार्य करीत असल्याबाबत आभार मानले आहेत.
तत्पूर्वी, शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या आझादी 75 अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमीत भारतीय संविधानाच्या विविध तरतुदीवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
