परमविरसिंह दिवाळी ‘गिफ्ट’ म्हणून घेत सोन्याची बिस्किटे !
परमबिरसिंहांच्या भ्रष्टाचाराची सुरस कथा !
परमविरसिंह दिवाळी गिफ्ट म्हणून घेत सोन्याची बिस्किटे.
मुंबई, दि. २८ एप्रिल.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करुन खळबळ उडवून देणारे मुंबईचे पोलिस आयुक्त व विद्यमान पोलीस अधिकारी परमबीरसिंह यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. परमविरसिंहाच्या भ्रष्टाचाराची आणखी एक तक्रार पोलीस अधिकारी भीरराव घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहायक पोलिस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्यांचे तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडून सुमारे ३० ते ४० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे घेत, अशी तक्रार घाडगे यांनी केली आहे. परमविरसिंह यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी राजू अय्यर या एजंटला ठेवले होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांची तक्रार आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८दरम्यान अधिकारांचा गैरवापर करून कोट्यवधींचा रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप अकोल्याच्या नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केला आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
