20201124_220159

मुंबईत दिवसभरात ८ हजार ६४६ करोना रुग्ण !

मुंबई, दि. 1 एप्रिल:
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, नागपूर, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज 4 हजार 103, पिंपरी चिंचवड 2 हजार 137 रुग्ण सापडले तर मुंबईत दिवसभरात ८ हजार ६४६ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून १८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांत बेड्सची व्यवस्था मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. बाधित रुग्णांना शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चाचण्याही करण्यात येत आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

कोरोनाची लक्षणे नसलेले, मात्र लागण झालेले रुग्ण, अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात राहण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र गृह विलगीकरण धोक्याचे ठरू लागले आहे. घरामध्ये स्वतंत्र खोली, प्रसाधनगृह असेल तरच रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची मुभा दिली जाते. अशा रुग्णांनी कुटुंबातील अन्य सदस्यांपासून दूर राहणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णांकडून ही काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सध्या तब्बल चार लाख १५ हजार २२९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. मात्र या रुग्णांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने गृह विलगीकरण धोक्याचे ठरू लागले असून एका सदस्यामुळे संपूर्ण कुटुंबच बाधित होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे ही नवी समस्या उभी ठाकली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *