पोलीस अधिकारी सचिन वाझेंना ‘एनआयए’कडून अटक

0
20210314_220322

पोलीस अधिकारी सचिन वाझेंना ‘एनआयए’कडून अटक

मुंबई, दि. 14 मार्च:

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळील स्फोटकांप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएने चौकशी केली होती. १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 25 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एनआयएने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. कुटुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी केली.

अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली.

वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत याचिका फेटाळून लावली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *