मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप!

0
20201219_215210

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप!
मुंबई, दि. 20 डिसेंबर:

मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत काँग्रेसने आमदार भाई जगताप यांच्याकडे मुंबईची धुरा दिली आहे. चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु केले. यामध्ये नसीम खान, सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. पण सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली.

इतर पदाधिका-यांमध्ये माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे, अध्यक्ष, डॉ. अमरजितसिंह मनहास यांना समन्वय समिती, अध्यक्ष, सुरेश शेट्टी, जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष, चंद्रकांत हंडोरेंना मुंबईचे प्रभारी, गणेश यादव तपासणी आणि रणनीती समिती, सचिव, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जगताप यांची निवड महत्त्वाची आहे. भाई जगताप या कामगार चळवळीतून आलेल्या मराठी नेत्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *