20201209_104750

भारतात सहा महिन्यात 5G सेवा!

मुकेश अंबानी यांची घोषणा.

नवी दिल्ली, दि. 9 डिसेंबर:
मोबाईल क्षेत्रात मागील काही वर्षात क्रांतीकारी बदल झाले असून स्मार्ट फोन वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. 4 G तंत्रज्ञानामुळे इंटरनेट चा स्पीड व कमी किंमतीत ते उपलब्ध झाल्यानेही या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आता पुढचा टप्पा 5 G चा आहे. आणि पुढील सहा महिन्यात देशात 5 G सेवा सुरू होईल अशी घोषणा रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली आहे .

२०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात ५ जी ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत, असे मुकेश अंबानी म्हणाले.

सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. आपण सेमी कन्डक्टरसाठी केवळ आयातीच्या भरवशावर राहू शकत नसल्याचंही ते म्हणाले.

देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २ जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत.

5 G मुळे इंटरनेट स्पीड प्रचंड मिळणार आहे. तीन तासाचा चित्रपट काही सेकंदात डाऊनलोड होऊ शकतो. याचा स्पीड 200 mbps असेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *