मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’!

0
20201130_185904

मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’ !

योगी आदित्यनाथांच्या विरोधात मनसेची बॅनरबाजी..

मुंबई, दि. 2 डिसेंबर:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक व बाॅलिवूड उत्तर प्रदेशमध्ये व्हावी आणि महाराष्ट्राची अधोगती व्हावी हा त्यांचा डाव असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसनेही यावर टीका केली आहेच त्यात आता मनसेनही उडी घेत योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीला विरोध केला
आहे.

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’ असे बॅनर झळकवत मनसेने आदित्यनाथ यांचे स्वागत केले.

योगी आदित्यनाथ यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलबाहेर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….कुठे महाराष्ट्रचं वैभव….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे बॅनर झळकवले आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचं स्वप्न.

असे बॅनर झळकवत मनसेने योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीला विरोध दर्शवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *