नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांची चिंता नाही : काँग्रेस

0
20201129_233631

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांची चिंता नाही : काँग्रेस

कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत धडकले.

नवी दिल्ली, दि. 29 नोव्हेंबर:

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातून वातावरण पुन्हा तापले आहे. पोलीस बाळाला न जुमानता हजारो शेतकरी दिल्लीत धडकले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिलेल्या काँग्रेसने आजही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

शेतक-यांचा प्रचंड विरोध असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या कायद्यांचे समर्थन करत आहेत. सरकारने त्वरित तिन्ही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी काँग्रेसने आज पुन्हा केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, जेव्हा लाखो शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत दिल्लीत धडकले असताना पंतप्रधान मोदी तिन्ही कायदे योग्य असल्याचे म्हणत आहेत. या सरकारला सत्तेची नशा असल्याचे दिसत आहे. शेतकरी, कामगार यांची मोदींना कसलीही चिंता नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *