धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिले नाहीत!

0
IMG_20201127_161748

असे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिले नाहीत !
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर:
महाविकास आघाडी सरकारकडे कोणतेही व्हिजन नाही. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना मदत देण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून विरोधी आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणारे हे सरकार आहे. कंगणा रनोट व अर्णब गोस्वामीवरील कारवाई ही त्यातील भाग आहे. हात धूवून मागे लागू असे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिले नाहीत, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठाकरे सरकारला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने भाजपने सरकारच्या कारभाराचा पाढा वाचला. यावेळी फडणवीस यांनी कोरोना संकट, वाढीव वीज बील, शेतकऱ्यांना मदत या प्रश्नांवर सरकारला घेरले. हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे. कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकलेले नाही.

सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही नाही. आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा आहे. कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत, ही परिस्थिती हातळ्यात सरकार अपयशी ठरले, असेही फडणवीस म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *