साईच्या दर्शनाला शिर्डीत जाण्यापूर्वी ‘हे’ कराच!

0
20201122_190719

शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला जाण्यापूर्वी ‘हे’ कराच !
साईभक्तांसाठी शिर्डी साई संस्थानचे आवाहन …

शिर्डी, दि. 22 नोव्हेंबर:
राज्यातील धार्मिक स्थळे आठ महिन्यांनंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आली परंतु मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शिर्डीच्या साई मंदिरांतही गर्दी होऊ लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता साई संस्थानने भक्तांसाठी आवाहन केले आहे.

साईंच्या कोणत्याही प्रकारच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग न करता शिर्डीत येणाऱ्या भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असून कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नका, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.

आठ महिन्यानंतर साई मंदिर भक्तांसाठी खुले करताना गर्दी होऊ नये यासाठी दर्शनाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. दर्शन सुलभ व सुखद व्हावे, यासाठी भक्तांना ऑनलाइन व मंदिर परिसरात काउंटरवर पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु दर्शनासाठी घालून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईभक्त शिर्डीत येऊ लागले आहेत. म्हणून कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नका असे आवाहन संस्थानने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *