पदवीधर व शिक्षकच्या भाजप उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा.

0
20201122_110409

पदवीधर आणि शिक्षकच्या भाजप उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा.

मुंबई, दि. 22 नोव्हेंबर:

महाराष्ट्रात 1 डिसेंबर रोजी होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे .

तीन पदवीधर मतदारसंघ आणि एका शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील भाजपचे संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. नितीन धांडे, या सर्व भाजप उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *