शिक्षकांनाही लोकल प्रवासाची परवानगी.

0
Local

शिक्षकांनाही मुंबई लोकल प्रवासाची परवानगी.

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर:
मुंबई लोकलसंदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा प्रस्ताव पश्चिम आणि मध्य रेल्वेने दिलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेत ५० टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिले होते. आता मुंबई उपनगरातील मार्गांवर धावत असलेल्या विशेष लोकल गाड्यांमधून शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे.

याआधी मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास सरकारी कर्मचारी, वकील यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच नवरात्रात सरसकट सर्व महिलांसाठीही लोकल प्रवास सुरु करण्यात आला. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा कशी गाठायची या चिंतेतून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *