बिहारमध्ये पुन्हा एनडीएलाच स्पष्ट बहुमत!

0
20201111_092952

बिहारमध्ये पुन्हा एनडीएलाच स्पष्ट बहुमत !

तेजस्वी यादव यांचा राजद सर्वात मोठा पक्ष..

नवी दिल्ली, दि. 11 नोव्हेंबर:

बिहार विधानसभेच्या मतमोजणीत शेवटपर्यंत चुरशीची होत एनडीएला बहुमत मिळाले. 125 जागा मिळवत भाजपा जेडीयुने सत्ता राज्यात यश मिळवले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. २४३ जागांपैकी एनडीए ने १२५ जागा मिळवल्या आहेत. यात ७४ जागा भाजप, ४३ जागा जदयू तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

तर महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ तर डाव्या पक्षांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए ला बहुमत मिळाले असल्याने नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.

रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही वाटत होते. मात्र शेवटी एनडीएने १२५ जागा मिळवल्या. या निवडणुकीत तेजस्वी यादव दैदिप्यमान कामगिरी करत मोदी- नितीशकुमार यांना विजयासाठी झुंजवले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *