हा कोणता राजधर्म आहे ?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या काळात देशभरात दलितांवरचे अत्याचार वाढले आहेत. कायद्याचा सन्मान करण्या ऐवजी, मुलींना सुरक्षा देण्याऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा सवाल त्यांनी विचारला.
लोकशाही सर्वात कठीण काळातून जात आहे. करोनाला हरवण्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी देशाला आहे त्या परिस्थितीत सोडले आहे.मोदींनी उत्तरदायीत्वापासून तोंड फिरवले आहे. महामारीशी लढण्यासाठी यांच्याकडे धोरणही नाही व विचार नाही.
मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरही त्यांनी टीका केली. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत व यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
