अंबाबाई मंदिरात विधिवत पुजा व घटस्थापना!

0
20201017_165314

कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर:
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख असलेल्या करवीरच्या अंबाबाई मंदिरातही भक्तीभावाने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्र उत्सावात अंबाबाईची नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. आज सकाळी नऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर श्रीपुजकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.

भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिरातही पारंपरीक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. उत्सव काळात नऊ दिवस अंबाबाची नभ सालंकृत पुजा बांधल्या जातात. आज पहिल्या दिवशी देवीची कुण्डलिनी रुपात पूजा बांधण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे उजळून निघाले आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये मंदिरावर अशाच पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. यावर्षी भक्तांना मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *