पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घ्या आता घरातूनच.
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घ्या आता घरातूनच.
पंढरपूर दि. १८ जून २०२०
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीलाही कोरोनाचा फटका बसला असून खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विठ्ठल दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन भक्तांना होत नसले तरी आता तुम्ही घरबसल्या विठुमाऊलीचे दर्शन घेऊ शकता.
श्री. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान या ऍपवर तुम्ही हे दर्शन घेऊ शकता तसेच www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावरही तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. टीव्ही व टीशवरही विठ्ठलाच्या दर्शनाची सोय केली आहे. महापूजा, धूप आरतीसह नित्योपचारही यावर तुम्हाला पाहता येणार आहेत.
दरवर्षी आषाढी वारासाठी पंढरपुरात लाखो वारकरी जमा होतात परंतु यावर्षी कोरोनाचे गंभीर संकट असल्याळे वारीसाठी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासानाने घेतलेली आहे. यावर्षी १ जुलै रोजी आषाढी वारी आहे परंतु कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठलाचे पददर्शन व मुखदर्शनासाठी वारकऱ्यांना सोडता येत नाही. मंदीर समितीनेचे केलेल्या या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घरातूनच घ्या व सुरक्षितही रहा.
