चंद्रपूर महापौरपदी भाजपा, काँग्रेसला उबाठाचा धक्का!

0
ch

मुंबई, दि. १० फेब्रुवारी २०२६

चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत उबाठाने काँग्रेसला धक्का देत भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचा महापौर तर उबाठाचा उपमहापौर विजय झाला आहे. भाजपाचा उमेदवार महापौर १ मताने विजयी झाला.काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत, एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. तर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्याने भाजपाला फायदा झाला.

भारतीय जनता पक्ष व एमआयएमची अदृष्य युती आहे याचा अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूर नंतर चंद्रपुरातही प्रत्यय आला आहे. चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदतच केली आहे, भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काँग्रेसला मदत केली असती तर काँग्रेसचा महापौर झाला असता.

चंद्रपुरात काँग्रेसला अंतर्गत गटबाजी भोवली आहे. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गटबाजी केली, त्याचे परिणाम काँग्रेस ला भोगावे लागले. महापौरपदासाठी दिल्लीपर्यंत जोर बैठका काढल्या तरिही काँग्रेस पक्षाने माती खाल्ली. काँग्रेस त्यांच्यात भांडत बसली व त्याचा फायदा भाजपाने उठवला. जनतेने चांगला कौल दिला पण नेत्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसला चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *