MNS चे प्रकाश महाजन शिंदेसेनेत.
MNS चे प्रकाश महाजन शिंदेसेनेत.
ठाणे, दि २६ डिसेंबर २०२५ ;
पक्ष बदलण्याचा सध्या मौसम असून आज प्रकाश महाजन यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश महाजन हे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे भाऊ असून याआधी ते मनसे मध्ये होते. मागील महिन्यात त्यांनी मनसे सोडली.
शिंदे सेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले, “अडीच वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता केले, हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेलं काम लोक विसरणार नाहीत. हिंदुत्वाविषयी जागरुक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असे महाजन म्हणाले.
