images - 2025-06-27T121125.937

RSS ची विचारसरणी राष्ट्रविरोधी..

मुंबई,  दि. १ डिसेंबर २०२५ ;

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS ) ला राष्ट्रविरोधी म्हटले आहे. भारत केवळ एका धर्मावर आधारित राष्ट्र असू शकत नाही आणि हिंदू राष्ट्र बनवण्याचा पुरस्कार करणारी कोणतीही संघटना किंवा विचारसरणी संविधान आणि देशाच्या विविधतेच्या विरोधात आहे असे आंबेडकर म्हणाले..

ते म्हणाले, RSS ची हिंदुत्व विचारसरणी आणि भारत हिंदू राष्ट्र असावा ही कल्पना आपल्या राष्ट्राचा विश्वासघात आहे. आरएसएसची विचारसरणी राष्ट्रविरोधी आहे. कारण, ज्या क्षणी कोणतीही संघटना देशाची ओळख एकाच धर्माने परिभाषित केली पाहिजे असा दावा करते, तेव्हा ती बाबासाहेबांच्या भारताच्या आणि संविधानाच्या कल्पनेवर हल्ला करते.”

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, भारताची स्थापना समानता, धर्मनिरपेक्षता आणि विविधतेवर झाली आहे आणि ती एकाच धार्मिक ओळखीपुरती मर्यादित केल्याने राष्ट्राचा आत्मा कमकुवत होतो. संविधानाच्या निर्मात्यांनी भारताला एक असे राष्ट्र बनवले आहे. जिथे सर्व धर्म, संस्कृती आणि समुदाय समान हक्कांसह राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *