20201002_142329

मुंबई, दि. २ ऑक्टोबर:
उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटना व त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारने सुरु केलेली दंडेलशाही यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं तसंच ज्या पद्धतीची वक्तव्यं जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे .

देशात अराजक माजले असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारने स्वत:ची चूक कबूल करावी. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या असताना मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री काहीही बोलण्यास तयार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली पाहिजे. राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर योगी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *