उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटल्यावर आम्ही आक्षेप घेतला का?
उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटल्यावर आम्ही आक्षेप घेतला का?
मुंबई दि.१४ फेब्रुवारी ;
शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली. यावरून रास्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेत आयोप प्रत्यारोप होत आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मागे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी आम्ही आक्षेप नोंदवला नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राजकारणातली कटुता संपविण्यासाठी संवादाचे पुल बांधणे गरजेचे असल्याचे सांगत शरद पवार यांनी कुणाला भेटावे आणि कुणाला भेटू नये हे कुणी सांगू नये. शरद पवारांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचं राजकारणातील स्थान, त्यांच्याशी विचारांची उंची ही अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. आम्हाला कधी कधी राग येतो की हे असं का करतात. पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ज्या माणसाने पवार यांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली सर्व केले त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही. हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
खोट्या पोलीस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांच्या राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक हे जे पाच दहा सुरु झालंय. ते पवारांना स्पर्श सुद्धा करत नाही, पवार कुठल्या व्यासपीठावर जातात याचा कोणी विचारही करू नये. शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेतो हा काय शब्द आहे का? असं काय मोठं केलंय त्यांनी, पण जेव्हा लढायची वेळ येईल. त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह हे शरद पवार असतील. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राजकारण म्हणजे फक्त, सूड, द्वेष, संपवून टाका, मारून टाका असं नाही. आपण सर्व एकमेकांना भेटता, एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाहीत ती गोष्ट वेगळी, अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही, पण मी अनेक पत्र पाठवून झालंय. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा पण त्यांचा परवा कधीच येत नाही. अमित शहा याला तडीपार बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण पवार बोलले, त्यांना जिथे वार करायचा तिथे ते करतात, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
