ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन.

0
images (78)

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन.

ठाणे, दि. २९ डिसेंबर ;

शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष व ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर, माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. दुपारी 2 च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवास स्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

सतीश प्रधान यांची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे.

 

सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे. सतीश प्रधान यांनी ठाण्यात अनेक विकासकामे केली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालय 1980 साली त्यांनीच स्थापन केले. ठाणे शहरात महापौर मॅरथॉन त्यांनीच सुरू केली होती. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेना व ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *