बीड व परभणीतील आरोपींवर कठोर कारवाई करा.

0
20241222_135556

बीड व परभणीतील आरोपींवर कठोर कारवाई करा.

परभणी, दि. २२ डिसेंबर ;

परभणी व बीडमध्ये जे घडले ते महाराष्ट्राला शोभणारे नाही. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने, समंजसपणाने करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी राज्य सरकारची भेट घेऊन या घटनांना जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी पावलं लवकर टाकावी या प्रकारचा आग्रह धरू असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले आहे.

शरद पवार यांनी परभणी जिल्ह्यातील नांदखेडा गावाला भेट देऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचीही चौकशी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बीड हा एकेकाळी वारकरी विचारांच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता पण ज्या प्रकारची गुंडगिरी, एकमेकांवरील हल्ले हे चित्र ऐकायला मिळालं हे अत्यंत दुर्दैवी होतं आणि ही अवस्था जर अशीच राहिली तर ती महाराष्ट्राच्या ऐक्याचा दृष्टीने अत्यंत घातक आहे. या ठिकाणी दहशतीचं वातावरण असून याच्यामागे जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि कठोर कारवाई करून त्याला आवर घातला पाहिजे ही जनतेची मागणी आहे.

 

परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरच्या संविधानाच्या संदर्भात जे काही झालं त्याची प्रतिक्रिया येणं हे साहजिकच आहे. ती झाल्यानंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहितीत दिसतं अशा तरुणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. हे चित्र परभणीला सुद्धा पाहायला मिळालं. नामांतराच्या चळवळीमध्ये काम करणा-या एका ज्येष्ठ सहका-याचा मृत्यू या ठिकाणी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *